महिले सोबत अनैसर्गीक कृत्य, त्या डॉक्टरला तीन दिवसाची कोठडी

28

महिले सोबत अनैसर्गीक कृत्य, त्या डॉक्टरला तीन दिवसाची कोठडी

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहाणी, डॉक्टरची पत्नी फरारच…

यवतमाल/महाराष्ट्र
रिपोर्ट:- शुभम जयस्वाल, संवाददाता
दि. 03 जनवरी 2022

सविस्तर घटना:- उपचारासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार, अनैसर्गीक कृत्य करणाऱ्या डॉक्टर गणेश साठे याच्यासह त्याच्या पत्नीवर अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्या डॉक्टरला ताब्यात घेतले असून न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. रविवार, दि. २ जानेवारीला पोलिसांनी त्या डॉक्टरला सोबत घेत घटनास्थळाची पाहाणी केली. मात्र या गुन्ह्यात असलेली डॉक्टरची पत्नी अद्याप फरार असून तिचा शोध पोलिस घेत आहे. डॉ. गणेश साठे वय ३७ वर्ष आणि तेजस्वीनी साठे वय ३२ वर्ष दोघेही रा. जुना उमरसरा यवतमाळ अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या डॉक्टर पती-पत्नीची नावे आहे.
शहरातील जुना उमरसरा परिसरातील डॉ. गणेश साठे याच्या रूग्णालयात सन २०१७ मध्ये एक महिला उपचारासाठी गेली होती. यावेळी गणेश साठे याने त्या महिलेला चूर्ण खायला दिले, त्यामूळे तिला गुंगी आली, याचाच फायदा घेत डॉ. साठे याने त्या महिलेसोबत शारिरीक अत्याचार आणि अनैसर्गीक कृत्य केले. दरम्यान अत्याचाराचा व्हिडीओ काढत तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. तीन वर्षापासून सतत सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून अखेर त्या महिलेने अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीच्या चौकशी अंती पोलिसांनी डॉ. साठे आणि त्याच्या पत्नीवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून डॉ. गणेश साठे याला अटक केली. दरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. रविवारी तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक दर्शन दिकोंडवार यांनी त्या डॉक्टरला सोबत घेवून ज्या-ज्या ठिकाणी त्या महिलेवर अत्याचार करण्यात आला, त्या ठिकाणची पाहाणी केली. मात्र डॉक्टरची पत्नी अद्यापही फरार असून तिचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक दर्शन दिकोंडवार करीत आहे.