पोस्टमास्तरला अटक तीन दिवसाची पोलिस कोठडी, कळंब पोलिसांची कारवाई..

134

लाखोंची अफरातफर करणाऱ्या पोस्टमास्तरला अटक
तीन दिवसाची पोलिस कोठडी, कळंब पोलिसांची कारवाई,

रिपोर्ट:- शुभम जयस्वाल, संवाददाता
दि. 03 जनवरी 2022

सविस्तर बातमी:- सहा वर्षात ग्राहकांची लाखो रूपयांनी फसवणूक करणाऱ्या पोस्टमास्तर गौरव दरणे याच्याविरोधात कळंब पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. अखेर कळंब पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्या पोस्टमास्तरला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कळंब तालुक्यातील कोठा येथील पोस्ट मास्तर गौरव दरणे गेल्या सन २०११ पासुन कोठा पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे. पोस्टामध्ये राबवित असलेल्या बचत खाते, आर. डी., सुकन्या अशा विविध योजनेतील खातेदार पोस्टरमध्ये रक्कम जमा करीत असताना पोस्ट मास्तर पासबुकावर शिक्का मारून देऊन पैसे घेत  होता. शासनाच्या तिजोरीत जमा न करता पैसा त्याच्या खिशात जात होते. तर काही पासबुक डुप्लिकेट छापलेले ग्राहकांना देऊन बनावट खाते उघडण्याचे तपासणीमध्ये उघड झाले आहे. सन २०१५ पासून सतत गैरप्रकार करीत असल्याचे तपासणीमध्ये  २४ लाख ४४ हजार ८५४ रुपयाचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. डाक अधिक्षक यांनी खात्याची तपासणी केली असता, सन २०१५ पासून गौरव दरणे अपहार करीत असल्याचे तपासणीमध्ये उघड झाले आहे. या खात्याच्या तपासणीचा अहवाल जिल्हा डाक अधिक्षक यांच्याकडे  सादर करण्यात आला असून कळंब पोलिस ठाण्यात दि. ९ आक्टोंबरला तक्रार देण्यात आली आहे. तेव्हापासून तो पोस्ट मास्तर अद्यापही फरारच होता. अखेर कळंब पोलिसांनी दोन दिवसापूर्वी पोस्ट मास्तर गौरव दरणे याला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले, यावेळी न्यायालयाने तिन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अभय चौथनकर, अंमलदार मंगेश ढबाले करीत आहेत.