लहान म्हशीचे हेले कोंबून नेणारा कंटेनर पोलिसांनी पकडला पांढरकवडा पोलिसांची कारवाई, ५१ लहान म्हशीचे हेल्यांची सुटका

111

लहान म्हशीचे हेले कोंबून नेणारा कंटेनर पोलिसांनी पकडला

पांढरकवडा पोलिसांची कारवाई, ५१ लहान म्हशीचे हेल्यांची सुटका

प्रतिनिधी । यवतमाळ शुभम जयस्वाल

सविस्तर बातमी:-  अवैधरित्या लहान म्हशीचे हेले कोंबून नेणारा कंटेनर पोलिसांनी पकडून ५१ लहान म्हशीचे हेल्यांची सुटका केली. ही कारवाई शुक्रवार, दि. १७ डिसेंबरला पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी जफरू सपीला मोहम्मद वय ४५ वर्ष, जियाउल असगर अली वय ३० वर्ष, सलमान खान मजीत खान वय २३ वर्ष, साहील खान सहीर खान वय २४ वर्ष सर्व रा. शिक्रावा हरियाणा आणि आसु मोहम्मद छज्जन वय ३० वर्ष रा. दोहा फिरोजपूर झिरका हरियाणा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहे.
या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पांढरकवडा मार्गाने हैद्राबादकडे एका कंटेनरमध्ये अवैधरित्या लहान म्हशीचे हेले कोंबून घेवून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पांढरकवडा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अदिलाबादकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून संशयीत कंटेनर क्रमांक एनएल-०१-क्यू-०८२१ गोप्रेमी नागरिकांच्या मदतीने थांबविला. दरम्यान त्या कंटेनरची तपासणी केली असता, त्यामध्ये जवळपास ५१ लहान म्हशीचे हेले कोंबून असलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर आणि ५१ लहान म्हशीचे हेले असा एकूण २० लाख ५३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या बाबत पांढरकवडा पोलिस ठाण्यात चालकासह चौघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. ही कारवाई पांढरकवडा ठाणेदार जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक अमोल कोळी, पथकातील पोलिस कर्मचारी राजु सुरोशे, सिध्दार्थ कांबळे यांनी पार पाडली.