औषधी दुकान फोडू चोरट्यांनी लांबविली लाखोची रोख औषधी दुकान फोडून.। डॉ. शहा यांच्या मेडीकलमधील घटना, चोरटा सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद.

71

औषधी दुकान फोडू चोरट्यांनी लांबविली लाखोची रोख औषधी दुकान फोडून.।

डॉ. शहा यांच्या मेडीकलमधील घटना, चोरटा सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद

प्रतिनिधी । यवतमाळ:- शुभम जयस्वाल

दि. 16 दिसंबर 2021

 सविस्तर बातमी:-  औषधी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने लाखो रूपयांची रोख लंपास केली. ही घटना शहरातील डॉ. शहा हॉस्पीटल परिसरात बुधवार, दि. १५ डिसेंबरला सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून औषधी दुकानातील सिसिटिव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला असून त्याचा शोध अवधुतवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.
या प्रकरणी योगेश शहा रा. आकृती अपार्टमेंट यवतमाळ यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनूसार, शहरातील शहा हॉस्पीटलच्या बाजूला योगेश शहा यांचे औषधी दुकान आहे. मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्यांनी औषधी दुकान नेहमीप्रमाणे बंद केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी योगेश शहा आणि दुकानात काम करणारा सुरेश भोयर औषधी दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे कुलूप उघडलेले दिसले. त्यामूळे त्यांनी आत जावून पाहाणी केली असता, ड्रॉवर आणि कपाटातील एक लाख ८० हजार रूपयाची रोख आढळून आली नाही. त्यामूळे औषधी दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती अवधुतवाडी पोलिसांना देण्यात आली. त्यावरून ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी औषधी दुकान गाठून पाहाणी केली. तसेच दुकानातील सिसिटिव्ही फुटेजची तपासणी केली असता, एक संशयीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक स्वप्नील निराळे करीत आहे.

मंदिराच्या दान पेटीतील रोख लंपास
शहरातील वडगाव परिसरात असलेल्या सिध्दीविनायक मंदिरातील दान पेटी फोडून चोरट्याने चार हजाराची रोख लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.