सविंधान चौक नागपूर बेमुदत धरणे आंदोलनाची एक मागणी WCL ने मान्य केली. आंदोलनकरी आमरण उपोषणाला बसणार, जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव BRSP..

166

सविंधान चौक नागपूर बेमुदत धरणे आंदोलनाची एक मागणी WCL ने मान्य केली.

आंदोलनकरी आमरण उपोषणाला बसणार, जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव BRSP

मा. सुरेशभाऊ म.पाईकराव चंद्रपूर जिल्हा महासचिव B.R.S.P

चंन्द्रपुर/महाराष्ट्र

सविस्तर:- मागील दहा वर्षांपुर्वी वेकोलि बल्लारपुर क्षेत्रातील चिंचोली रिकास्ट प्रकल्पात सुमारे २०५ प्रकल्पग्रस्तांना मार्च २०१४ पासून नोकरी देण्याचे लेखी स्वरूपात वेकोलि प्रशासनाची योजना होती. करारनामा करण्यासाठीचा नोटीस सुधा प्रकाशित केल्या पण शेवटच्या टप्प्याची नोकरी देण्याची प्रक्रिया जाणीव पूर्वक लांबवण्यात येत असल्याचे चित्र दीसत होते. वेकोलि च्या चुकीच्या नियोजना मुळे व स्थानीक नेत्यांनी या कडे दुर्लक्ष्य केल्यामुळे २०५ प्रकल्पग्रस्तांना आज पर्यंत उपासमारी ची पाळी आली होती.
प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल या इच्छेने वेकोलि व जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठकीत वारणवार चर्चा करण्यात आल्या पण काहीही तोड़गा निघत नसल्याने स्थानिक राजुरा व चंद्रपुर चे आमदार, खासदार यांना मदतीचा हाथ मांगितला त्यातपण फक्त प्रकल्पग्रस्तांच्या पदरात हवेत आश्वासने मिळाले. म्हणून नेते मंडळी वरच्या विश्वास उडाला असे मत प्रकल्पग्रस्तांना वाटत होते.

 

समोर 1 जुलै 2021 रोजी चिंचोली प्रकल्पग्रस्तांच्या संपर्क बीआरएसपी चे चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेशभाऊ म. पाईकराव यांच्या सोबत झाला असून 1 जुलै 2021 या दिवशी सुबई गावात बैठकीत आंदोलन च्या इशारा देऊन आपला हक्क मांगितल्याने मिळत नसेल तर हिसकुन घ्यावा लागतो असे ठाम मत प्रकल्पग्रस्तांना समझले व या पुढचे आंदोलना चे नेतृत्व मा.सुरेशभाऊ म.पाईकराव यांनी करतील असे लेखी निवेधन प्रकल्पग्रस्तांनी दिले व लोकत्रान्तिक हक्क मागणि ला सुरुवात केली. या चिंचोली प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवुन देण्याकरिता मा.सुरेशभाऊ म.पाईकराव यांच्या नेतृत्व खाली तीन ते चार वेळा जिल्हाधिकारी व वेकोलि सीएमडी सोबत चर्चा केली व हे प्रकरण मार्गी लावावे आणि प्रकल्पग्रस्तांना आधी नोकरी देऊन प्रकल्पाला सुरुवात करावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी होती. परंतु, वेकोलिने याकडे दुर्लक्ष केले. यातून काहीही निष्कर्ष निघत नसल्याने मा. सुरेशभाऊ म.पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे-प्रधर्शने जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्यात आले व काही दिवसा नंतर अर्धनंग आंदोलन सुद्धा करण्यात आले. तरी पण या वेकोलि बल्लारपुर क्षेत्रातील चिंचोली रिकास्ट प्रकल्पाकडे दुर्लक्ष्य केलेल दिसत असल्याने, दि. 14 नोव्हेंबर ला सूबाई गावात आढावा बैठक घेण्यात आली असून यानंतरचे पुढील आंदोलने अजुन तीर्व भूमिका घेऊन नागपुर ला वेकोलि सीएमडी ऑफीस समोर बेमुदत-धरने आंदोलने करण्यात येईल व न्याय मिळे पर्यन्त वेकोलि सीएमडी समोर आंदोलन चालु राहतिल असा इशारा वेकोलि व प्रशासन ला दिला.व दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 205 प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्या करीता संविधान चौक नागपूर ईथे W.C.L वेकोली च्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली असून आज दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी त्या W.C.L वेकोली च्या C.M.D ला चंद्रपूर जिल्हा महासचिव मा.सुरेशभाऊ म.पाईकराव यांनी उभारलेले आंदोलना समोर झुकून आंदोलनाच्या 12 व्या दिवशी प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला देण्यास तयार झाले आता नोकरी साठी BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी W.C.L वेकोली असे म्हटले की जोपर्यंत या 205 प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार असा इशारा सुद्धा देण्यात आला.