विजय क्रांती संघटना” कामगारांसाठी बजावणार न्यायपूर्ण भूमिका- ना.विजय भाऊ वडेट्टीवार

161

विजय क्रांती संघटना” कामगारांसाठी बजावणार न्यायपूर्ण भूमिका- ना.विजय भाऊ वडेट्टीवार

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 16 नवंबर 2021

सविस्तर बातमी:- क्रांती संघटनेत एसीसी चांदा सह अल्ट्राटेक व अंबुजा येथील कामगारांचा पाठींबा* *विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लबचे अध्यक्ष प्रविणभाऊ लांडगे* यांच्या मार्गदर्शनाखाली “विजय क्रांती संघटने” कार्य सुरु आहे. विजय क्रांती संघटनेला अनेक कामगार वर्गाचा पाठींबा लाभत असून कामगार वर्ग ह्या संघटनेशी जुळत आहे. विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा कु. शिवानीताई विजय वडेट्टीवार यांनी विजयभाऊ वडेट्टीवार यांचा मार्गदर्शनातून उभारलेल्या या संघटनेच्या आधारे कामगार वर्गाला हक्काचे स्थान प्राप्त झालेले आहे. संघटनेचा प्रसार अनेक खाजगी कंपनी मध्ये होत आहे. यामध्ये प्रामुख्याने एसीसी चांदा सिमेंट वर्क, अंबुजा सिमेंट कंपनी तसेच अल्ट्राटेक कंपनी माधिक कामगार वर्ग मोठ्या संख्येने विजय क्रांती संघटनेत कार्य करीत आहे.
विजय क्रांती संघटन उभारण्यामागे कामगार वर्गाला त्यांचा हक्क मिळवून देणे आहे. तसेच कामगारावर होत असलेले अत्याचाराला प्रतिबंध लावणे ह्या उदेशातून हि संघटना कार्यकरीत आहे. अंबुजा कंपनी मधील विजय क्रांती संघटनेला पाठींबा देणारे व संघटन मध्ये जुळलेले काही कामगारांचे विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते दुपट्टे देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विजय ठाकरे, नंदू नागरकर व त्यांचासह सहकरी कामगाराचे यावेळी संघटनेत स्वागत करण्यात आले.