रक्षण धरणी मातेचे संस्थेतर्फे बालक दिन उत्साहात साजरा…   ऍनेस्थेशिओलॉजिस्ट डॉ. मुकुंद पालीवाल यांचे मार्गदर्शन..

111

रक्षण धरणी मातेचे संस्थेतर्फे बालक दिन उत्साहात साजरा…
 
ऍनेस्थेशिओलॉजिस्ट डॉ. मुकुंद पालीवाल यांचे मार्गदर्शन..

चंन्द्रपुर/महाराष्ट्र

चंन्द्रपुर शहर:- दि. 14 नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने आज सकाळी ०८:०० वाजता जमनजट्टी दर्गाह येथे बालक दिन साजरा करण्यात आला. रक्षण धरणी मातेचे संस्थेतर्फे स्वच्छते बाबतच्या तसेच प्लास्टिक निर्मूलनाविषयी सतत वेगवेगळ्या मोहीम राबविण्यात येत असतात. प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा पुनर्वापर कसा करता येईल याबाबत सुद्धा दर
रविवारी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

बालक दिनाच्या औचित्याने आरुष अविनाश लेनगुरे, तिथी अमित जोगे, वेदांत भूषण सोनकुसरे या बाल मंडळींनी प्लास्टिकचा वापर झाल्यानंतर प्लास्टिक इकडे-तिकडे न टाकता dustbin चा वापर करावा तसेच इको-ब्रिक्स बनविण्यास हातभार लावावा. प्लास्टिकचे दुष्परिणाम बघता प्लास्टिकचा वापर कमीत कमी करून पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन या चिमुकल्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केले.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे ऍनेस्थेशिओलॉजिस्ट डॉक्टर मुकुंद पालीवाल यांनी प्लास्टिक रिसायकल करून कोणकोणत्या वस्तू बनविलेल्या आहेत
याबद्दल उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. भविष्यात प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त व्हायचे असेल, येणाऱ्या पुढच्या पिढीचे प्लास्टिक प्रदूषणापासून रक्षण करायचे असेल तर प्लास्टिक रिड्युस-रियुज-रिसायकल करणे किती आवश्यक आहे, हे मार्गदर्शनातून समजावून सांगितले.

सदरकार्यक्रमाच्या वेळी रक्षण धरणी मातेचे या संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर, उपाध्यक्ष अविनाश लेनगुरे, राजीव शेंडे, भूषण सोनकुसरे विजय मोहरे, रश्मी कोटकर, प्रिया जोगी, हरप्रीत सिंग, विशाल पेंदोर, गौरव वरारकर , मृणाल वडगावकर, तृप्ती गौरकार, मयुर उरीते, ईशा वरारकर, हर्ष पेंदोर, ज्योत्स्ना गौरकार तसेच संस्थेतील इतर सदस्य उपस्थित होते.