भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी केली कोळशाच्या जडवाहनांची होणाऱ्या नवीन मार्गाची पाहणी… घुग्घुस वासियांना प्रदूषण व वाहतुकीच्या त्रासापासून मिळणार मुक्ती – भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे…

83

भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी केली कोळशाच्या जडवाहनांची होणाऱ्या नवीन मार्गाची पाहणी.

घुग्घुस वासियांना प्रदूषण व वाहतुकीच्या त्रासापासून मिळणार मुक्ती – भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे..

गुरवार 28 ऑक्टोबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे, भाजपाचे सिनू इसारप, भारत साळवे, तुलसीदास ढवस यांनी संयुक्तरीत्या कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक होणाऱ्या जिओसी कोळसा खाण, कॉ नं 2 येथील बहिरमबाबा मंदिराच्या मागुन बेलोरा पुला पर्यंत प्रगती पथावर असलेल्या नवीन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.

याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस शहरातून होणारी कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक शहराच्या बाहेरून व्हावी यासाठी मार्गाची पाहणी करण्यात आली असून या मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. जवळपास 90% या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच घुग्घुस शहरातून होणारी जडवाहतूक बंद होणार आहे अवघ्या काही दिवसात शहरातून होणारी जडवाहतूक या मार्गाने सुरु होणार आहे. त्यामुळे घुग्घुस वासियांना प्रदूषणाचा व कोळशाच्या जडवाहतुकी मुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.

दिनांक 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घुग्घुस शहरातून जाणारी कोळशाची जड वाहतूक त्वरित बंद करावी असे निर्देश लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. मागील काही महिन्यापासून घुग्घुस शहरातून जाणाऱ्या कोळशाच्या जडवाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषण व अपघाताची शक्यता लक्षात घेत असे निर्देश देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने लगेच दुसऱ्या दिवशी दिनांक 28 सप्टेंबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांनी संयुक्तरीत्या उसगाव ते नकोडा जिओसी कोळसा खाण मार्गे बेलोरा पुला पर्यंत पाहणी करून चर्चा केली होती.
दरम्यान वेकोली अधिकाऱ्यांनी नवीन मार्ग बनविण्यासाठी काही दिवसाचा वेळ मागितला होता.
काही दिवसा पूर्वीच जिओसी कोळसा खाण कारगिल चौक मार्गे बेलोरा पुला पर्यंत या नवीन मार्गाचे काम सुरु झाले त्यामुळे भाजपाच्या शिष्टमंडळाने या मार्गाची पाहणी केली परंतु हे काम संथगतीने सुरु असल्याने दिनांक 24 ऑक्टोबर रोजी वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांची भाजपाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या नवीन मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी निवेदनातून केली.
यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील महिन्याच्या 10 नोव्हेंबर पर्यंत हा मार्ग सुरु करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे भाजपाच्या मागणीला यश आले.
त्याअनुषंगाने आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांसोबत त्या
मार्गाची पाहणी केली.
तसेच या दरम्यान प्रदूषणापासून सुटका मिळण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांच्याशी चर्चा करून घुग्घुस शहरातील राजीव रतन चौक, बस स्थानक चौक ते वियान्नी विद्या मंदिर पर्यंतच्या रस्त्यावर टँकरने पाणी मारणे व धूळ साफ करण्याची त्यांना विनंती केली त्यांनी लगेच उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे यांना निर्देश देऊन टँकरने पाणी मारणे व धूळ साफ करण्यासाठी सांगितले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एसीसी सिमेंट कंपनीचे अधिकाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून एसीसी ते घुग्घुस बसस्थानका पर्यंतच्या रस्त्यावर टँकरने पाणी मारून धूळ साफ करण्याची मागणी केली व एसीसी प्रशासनाने सुद्धा मागणी मान्य करीत या रस्त्यावर पाणी मारून धूळ साफ करणार असल्याचे सांगितले.