जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड भ्रष्टाचाराचा पर्दाफाश..! जमीन खरेदी गैरव्यवहार घोटाळाप्रकरणी संचालक मंडळ दोशी…!

152

जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड भ्रष्टाचाराचा पर्दाफाश..!

जमीन खरेदी गैरव्यवहार घोटाळाप्रकरणी संचालक मंडळ दोशी…!

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.24 अक्टूबर 2021

चंन्द्रपुर: श्री अजय डोर्लीकर अध्यक्ष, श्री इंदू कोटनाके उपाध्यक्ष, श्री उमाकांत पिंपळशेंडे सचिव, श्री लोकेश वानखेडे सहसचिव, श्री सदानंद कवठे, अमोल वनकर, श्री यशवंत मडावी, सतीश कवरासे, महेश अंगडलवार, विनोद कार्लेकर, परशुराम दुरुतकर, अजय टेप्पलवार, ज्ञानेश्वर गौरकर, कुंदाताई शेडमाके या संचालकांना व सुनंदा पडगेलवार, व्यवस्थापक यांना सुनावणी नोटीस जारी करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडीट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर, येथे झालेला जमीन खरेदी गैरव्यवहार घोटाळा उघडकीस आणणारे श्री सचिन बबनराव मुरकुटे, सचिन तल्हार व इतर सहकारी सभासद यांनी मिळून जमीन खरेदी व इतर आर्थिक घोटाळ्याचा  पर्दाफाश केलेला आहे.

संचालकाच्या मनमर्जी व मुसद्दीगिरीची तक्रार जिल्हा उप निबंधक, श्री प्रशांत धोटे यांच्याकडे करण्यात आल्याने यांनी तात्काळ संचालक मंडळा विरुद्ध चौकशी गठीत करून अहवाल मागितला. प्राप्त अहवालानुसार संचालक मंडळ हे जमीन खरेदी रुपये 2,67,71,060/- गैरव्यवहार प्रकरणी   दोषी आढळले आहेच,  पुन्हा संचालक मंडळ आमसभेच्या रुपये 12,01,746/- गैरव्यवहारीक खर्चाची चपराक त्यांना बसली कर्मचारी यांच्या बनावट स्वाक्षरी करणे व आर.डी. वरील व्याजाच्या वसुलीचीही कार्यवाही.

प्रामाणिक व धडाडीचे नेतृत्व असलेले उप निबंधक श्री प्रशांत धोटे यांनी भ्रष्टाचारी संचालकावर दंडात्मक कार्यवाही संबंधाने दिनांक 27 ऑक्टोंबर 2021 रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली असून आता सुनावणी, अंती काय निर्णय होणार याचे भ्रष्टाचारी संचालक धाबे दणाणले असून, न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे सभासद यांचे लक्ष वेधले आहे.
सभासद यांची मागणी आहे की आशा भ्रष्ट संचालक मंडळ विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून सर्व रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी, व पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी पदावरून तात्काळ बरखास्त करण्यात यावे.