काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

61

 

काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.।।

चंन्द्रपुर/महाराष्ट्र

दि10 अक्टूबर 2021

घुग्घुस—प्रतिनिधि

सविस्तर बातमी घुग्घुस: काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.प्रकाश देवतळे यांचे घुग्घुस शहरात आगमन होताच येथील राजीव रतन चौकात फटाक्यांची अतिशबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.व काँग्रेसचे नेते शेखर तंगलापेल्ली यांच्या शिवा रेस्टॉरंटला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी चंद्रपूर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शोभाताई ठाकरे,शहर अध्यक्ष राजू रेड्डी,काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी,शेखर तंगलापेल्ली,युवक काँग्रेसचे तौफिक शेख, सुरज कन्नूर, गणेश उईके, अनिरुद्ध आवळे, कल्याण सोदारी, अजय उपाध्ये, पवन नागपुरे, शिवा तंगलापेल्ली यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.युवक काँग्रेसचे नेते सिनु गुडला यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सदानंद कलवेनी, तिरुपती गोडगू, मनोज चिकाटे, अजित गेडकर, संपत सेवनतुला, राजेश मल्लारप, सचिन दुर्वे, यशवंत तक्कला, अंजय्या इरगुराला, रवी सिंदोला, अशोक जंगम, निरंजन कोरकंटी, वृषभ नलभोगा, संजय कोटा, रंगनाथ शेट्टी, प्रेम गणगोनी, संकेत पाटील, गणेश कोटगीलवार, शंकर अटकापुरम, दिनू वर्मा, मुरलीकृष्ण गुडला, माणिकचंद तग्रपवार, सुभाष अरेल्ली, मन्नू शर्मा, ज्योती टूस्से, विजया गुडला, महेश्वरी शेट्टी, स्वरूपा भुसावेणी अश्या अनेक युवकांनी व महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात स्वागत केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.