घुग्घुस वेकोली परिसरात समस्यांचा डोंगर, वसाहतीच्या विविध समस्या तात्काळ सोडवा – संजय तिवारी

22

घुग्घुस वेकोली परिसरात समस्यांचा डोंगर,

वसाहतीच्या विविध समस्या तात्काळ सोडवा – संजय तिवारी

चंन्द्रपुर/महाराष्ट्र

दि.03 अक्टूबर 2021

पुरी खबर:- घुग्घुस येथील वेकोलीच्या इंदिरा नगर, सुभाष नगर, गांधी नगर, राम नगर, शास्त्री नगर, राजीव कॉलनी, बंगाली कॅम्प या वसाहतीत अनेक समस्या आहे.

जंगल कचरा साफसफाई, नाली सफाई, पाणी पुरवठा, संडास गटार, फवारणी, रस्त्यावर लाईट लावणे अश्या विविध समस्या सोडविण्यासाठी सब एरिया मॅनेजर वेकोली फुल्लारे साहेब घुग्घुस यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी बोलताना भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे सचिव संजय तिवारी यांनी समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

निवेदन देतांना संजय तिवारी प्रदेश सचिव उत्तर भारतीय मोर्चा,  भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसभापती पं.स.निरीक्षण तांड्रा, रत्नेश सिंग, सुरेंद्र जोगी, शाम आगदारी ,राजश्री इरपंवॉर,कीर्ती ठाकुर, सावरकर मेडम ,आशा शुक्ला, उपस्थित होते.