श्रीराम सेना साकोली तर्फे बस सेवेची मागणी..!  खोडशिवनी मार्गावर पुनः सकाळ पाळीत बस सेवा सुरु करा..!  विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिनभाऊ सोनवाने यांची मागणी..!

74

श्रीराम सेना साकोली तर्फे बस सेवेची मागणी..!

 खोडशिवनी मार्गावर पुनः सकाळ पाळीत बस सेवा सुरु करा..!

 विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिनभाऊ सोनवाने यांची मागणी..!

साकोली/भंडारा
_२३ सप्टें., मंगळ_

अख्खं देशभरातचं नव्हे तर संपूर्ण जगभरात, कोरोना महामारीने थैमान घातले आहे त्यावर पर्याय म्हणून केंद्र व सर्व राज्य सरकार देशभर/राज्यभर कोरोना शिबिर लसीकरण व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास जनतेला विनंती करत आहेत.
काही धंद्यांना सुरू करण्याची परवानगी जरी नसली तरी सुद्धा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे थोडेफार का होईना मात्र शाळा व महाविद्यालयांमध्ये, शाळेची घंटी वाजलेली आहे, हे मात्र खरयं !
याच पार्श्वभूमीवर, साकोली शहरापासून २० ते २५ किमी अंतरावर असलेल्या खोडशिवनी मार्गावर सकाळ पाळीत ७ वाजेची बस-सेवा उपलब्ध नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी यायला विद्यार्थ्यांचे रोज हाल होत आहेत.
खोडशिवनी मार्गावर एक दोन गावांचाच नाही तर, विर्शी फाटा, विर्शी, PHC नगर विर्शी, मोखे, किन्ही, शंकरपुर, सातलवाडा व गिरोला तसेच हेटी इ. खेडेगावांचा समावेश आहे व येथील विद्यार्थ्यांना रोज तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी यावं लागतंय व प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.
वरील प्रकरण लक्षात घेता, श्री राम सेना सामाजिक संघटना साकोली तर्फे विद्यार्थ्यी तालुकाध्यक्ष सचिनभाऊ सोनवाने यांच्या नेतृत्वाखाली, सौ. साखरवाडे मॅडम (साकोली आगार) यांना बस-सेवा सुरू करण्याबाबत निवेदन पत्र देण्यात आले आहे.
वरील निवेदन पत्र देते वेळी श्री राम सेना शंकरपुर चे उपाध्यक्ष राकेश सयाम, सचिव मनोहर सयाम, कोषाध्यक्ष मंगेश सयाम व सहकोषाध्यक्ष दिशांत कोचे तसेच खोडशिवनी मार्गावरील विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी प्रामुख्याने उपस्थित होते.