घाटातून रेती उपसा होत असून तामसी रिठ ते इरई मार्ग पूर्णतः खराब झाला…| मार्ग दुरुस्त करून देण्यात यावा अशी समस्त ग्रामवासियाची तहसीलदार साहेबा कडे केली मागणी…|

70

घाटातून रेती उपसा होत असून तामसी रिठ ते इरई मार्ग पूर्णतः खराब झाला…|

मार्ग दुरुस्त करून देण्यात यावा अशी समस्त ग्रामवासियाची तहसीलदार साहेबा कडे केली मागणी…|

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.21 सितंबर 2021
घुग्घुस–प्रतिनिधि

सविस्तर बातमी:- कोरपना तालुक्यातील तामसी घाटातून रेती उपसा होत असून तामसी रिठ ते इरई मार्ग पूर्णतः खराब झाला असून त्या मार्ग दुरुस्त करून देण्यात यावा अशी समस्त ग्रामवासियाची तहसीलदार साहेबा कडे केली मागणी

कोरपणा:- गट ग्रामपंचायत भारोसा  अंतर्गत येत असलेल्या तामसी घाट वेळोवेळी लिलाव होत असून  तामसी रेती घाटातून रेती  उपसा होत असल्यामुळे तामसी रेती घाट ते इरई या मार्गाचे पूर्णतः खराब  झाला आहे. तरी भारोसा व  इरई येथील नागरिकांना आणि गावातील विध्यार्थी-विदयार्थ्यांनीना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भारोसा येथे ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करत अडीच किलोमीटर पायदळ चिखल तुळवत प्रवास करत ये-जा कराव लागत असून.ज्या ठेकेदाराला रेती घाट लिलाव देण्यात आला आहे त्या ठेकेदारामार्फत या सदर मार्गाचे दुरुस्ती करण करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत भारोसा येथील सरपंच मा.श्री देवराव निमकर इरई येथील सामाजिक कार्येकर्ते कु.निखिल पिदूरकर, रामचंद्र आगलावे, संबा निखाडे, ज्ञानेश्वर खापणे, बापूराव मटाले, संजय ढवळे, विठ्ठल झाडे, अंकुश मटाले, सुनील तेलंग, धनराज भगत, प्रवीण आत्राम, दीपक पावडे, विठ्ठल बोबडे, गणेश निमकर, गणेश रोगे, एकनाथ पावडे, राजेंद्र वरारकर, बाळा गोहणे, श्रीकृष्ण आत्राम अखिल निखाडे आणि इतर नागरिक उपस्थित होते.