सदस्यता सत्यापणात कोयला श्रमिक सभा अव्वल.. बेलोरा नायगाव खाणीत विजयत्सव साजरा

73

सदस्यता सत्यापणात कोयला श्रमिक सभा अव्वल..

बेलोरा नायगाव खाणीत विजयत्सव साजरा

यवतमाल/महाराष्ट्र

घुग्घुस–प्रतिनिधि

सविस्तर बातमी:- कामगार संघटनेच्या सदस्यता सत्यापणाची प्रक्रिया नुकतीच वेकोलीच्या सर्व कोळसा खाणीत पार पडली त्यात वेकोली वणी क्षेत्राच्या बेलोरा नायगाव या कोळसा खाणीत हिंद मजदूर सभा संलग्नित कोयला श्रमिक सभा या संघटनेने सर्वात जास्त सदस्य मिळवून सदर कोळसा खाणीत आपले वर्चस्व प्रस्तावित केले.
संघटनेच्या या उल्लेखनिय यशात संघटनेचा पदाधिकारी व सदस्यांचे कठोर परिश्रम असल्याचे मत सदर संघटनेचे वणी क्षेत्राचे अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी व्यक्त केले.
सदस्यसंख्येत संघटनेला अव्वल स्थान मिळाल्यामुळे संघटनेतर्फे खाणीत जल्लोश करण्यात आला .व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर बोबडे, सचिव आर. के.जयस्वाल, उपाध्यक्ष किशोर जूनघरे, सहसचिव रोशन जोगी, या पदाधिकाऱ्यांसह अरुण मेश्राम, सुनील बिपटे, प्रकाश दास, प्रकाश देऊळकर, ज्ञानेश्वर लांडगे, दिलीप वाढई, टी. एस. भारी, अनिल रेगुंडवार, एम.आर. चौधरी, अमित गजभिये, मनोहर पारेवार, कुणाल देउळकर, अजित पिंपळशेंडे, संजय पिंपळशेंडे, संजय पिंपळकर व अन्य कामगार उपस्थित होते.यावेळी कामगारांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.