शहरातुन जाणाऱ्या नकोडा-पैनगंगा-मुंगोली येथील जड वाहतुक बंद करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

134

शहरातुन जाणाऱ्या नकोडा-पैनगंगा-मुंगोली येथील जड वाहतुक बंद करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

घुग्घुस–प्रतिनिधि

घुग्गुस शहरातून जाणाऱ्या नकोडा-पैनगंगा-मुंगोली येथील जड वाहतुक बंद करा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
नकोडा- पैनगंगा मुंगोली येथील जड वाहतूकी घुग्घुस मुख्यमार्गाने बंद करुन वेकोलीच्या बाय पास मार्गाने वाहतूकी करण्यात यावी,तसेच जड वाहतूकी मुळे नागरिकांना अनेक समस्याने तोड द्यावे लागत आहे,तसेच ताळपोलीनविना कोळसा वाहतूक होत असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच मुख्य मार्गाने जड वाहतूक सुरू असून विमला साइडिंग वरून इस्टिम कोळसा नेल्या जात आहे, ही जड वाहतूक विमला साइडिंगवर चालनाऱ्या वाहनाने होत असून हे बंद करुन वेकोलीच्या बाय पास मार्गाने वाहतूकी करावी अशी मागणी नागरिकातर्फे व यंग चांदा ब्रिगेडचे नेते इमरान खान, स्वप्निल वाढई, अनूप भंडारी,प्रितम भोंगळे, नागेश तुराणकर, पंकज धोटे, आकाश चिलका आदींनी केली आहे.