घुग्गुस शहरात लागलेल्या अनाधिकृत होल्डिंग्स, बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण, नगरपरिषदेचे दुर्लक्ष

70

घुग्गुस शहरात लागलेल्या अनाधिकृत होल्डिंग्स, बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण, नगरपरिषदेचे दुर्लक्ष

चद्रपुर /महाराष्ट्र
दि. 15 सितंबर 2021
रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता
पुरी खबर :- घुग्गुस शहरात लागलेल्या अनाधिकृत होल्डिंग्स,बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून याकडे मात्र नगरपरिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.गेल्या काही वर्षांत अनधिकृत फलकांचे शहर म्हणून घुग्गुस शहर ओळखला जात आहे, या अनधिकृत फलकांनी केवळ शहराचे विद्रुपीकरण झाले असे नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचेही प्रश्न निर्माण केले आहेत.तसेच नगर परिषदेचा कर सुद्धा मोठ्या प्रमाणात बुडत आहे.

सत्ताधारी व विरोधी अशा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक उभारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. परिणामी, शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्ते व चौक अनधिकृत फलकांच्या जंजाळात सापडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येण्याबरोबर अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या सर्व प्रकाराकडे घुग्गुस नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून अनाधिकृत होल्डिंग्स व बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.