डिजिटल मीटर बदलण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फरार अविनाश भोंडे यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी… प्रिया झांबरे आदर्श मिडिया महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष,

86

डिजिटल मीटर बदलण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फरार अविनाश भोंडे यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी…

प्रिया झांबरे आदर्श मिडिया महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष,

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 02 सप्टेम्बर 2021

सविस्तर बातमी:- अविनाश भोंडे हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात डिजिटल मिटर बदलण्याच्या नावाखाली प्रत्येक तालुक्यानूसार प्रत्येक वैक्तीकडून एक लाख रुपये आणि लोकसंख्या तालुक्यात अधिक आहे. तेथे लोकांकडून एक लाख पन्नास हजार रुपये आहेत असे लोकांना सांगून पैसे 2018 मध्ये लोकांकडून घेतले गेले आहे. तसेच अविनाश भोंडे यानी प्रधान मंत्री मूद्रा लोन तसेच प्रधान मंत्री आवास योजनेच्या नावाखाली 10 ते 15 हजार लोकांकडून प्रतेकी 600 ते 700 रूपये घेऊन गडचिरोली येथील आॅफीस बंद करून फरार झाले आहे

हे लोकांना माहिती होताच अविनाश भोंडे यांच्या घरी पैसे मागण्यास लोकं गेले असता तुमचे पैसे आज देतो उद्या देतो असे बहाणे सांगून घरून फरार राहत होता. शेवटी हे लोकं व गडचिरोली जिल्ह्याचे सुशिक्षित बेरोजगार तरुण यांनी आदर्श मिडीया असोसिएशनला निवेदन देऊन मदत करण्याची विनंती केली. व आदर्श मिडीया असोसिएशनच्या माध्यमातून पोलिस स्टेशन हूडकेस्वर नागपूर यांना मेलद्वारे माहिती दिली व पोलिस अधिकारी एसीपी पावलेकर सर नागपूर आणि डिसीपि शिंदे सर नागपूर यांचाही चर्चा करणार आहे. कंपनीचे एम डी अविनाश भोंडे यांनी 31 आॅगस्ट आणि 1संप्टेबर ला पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. योग्य वेळी पैसे न दिल्यास आदर्श मिडिया असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्षा प्रिया झांबरे व जिल्हा अध्यक्ष संगिता वनकर व ईतर आदर्श मिडीया असोसिएशन चे पदाधिकारी पोलिस विभागामार्फत पूढील तपास करायला लाऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या विरूध्द योग्य कारवाई करूण जनतेला व गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करतील.