उकनी खदान परिसरात चोरी की घटनात आठ आरोपी अटक

51

उकनी खदान परिसरात चोरी की घटनात आठ आरोपी अटक
   
चन्द्रपुर महाराष्ट्र
रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी:- शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील उकनी खदान परिसरात तीन तार चोरट्याना अटक करण्यात आली. दि.13/8/2021 ला पोलीस स्टेशन येथे उकनी खदान परिसरातून 25 फूट केबल किंमत 10 हजार चोरीचा गुन्हा दाखल झाला. दोन तासातच ठाणेदार सचिन लुले यांनी त्याठिकाणी भेट दिली शोध सुरु असतांना एका नाल्यात तीन आरोपी महेश बासु दुर्गे (22), नसीम निजामुद्दीन शेख (31), श्रीकांत सुरेश आगदारी (28) सर्व रा. घुग्घुस केबल मधील तांब्याचा तार काढून जाळत दिसले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, अप्पर अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन लुले, प्रमोद जुनूनकर, अनिल सुरपाम, विनोद मोतेराव, विजय फुल्लूके यांनी केली.

प्रमोद जुनूनकर यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता ते फोन उचलत नाही.
शिरपूर पोलिसांची भंगार चोरी करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाही राबवून

आरोपी अक्षय वेंकटी तलांडे ( 25) रा. घुग्घुस, आकाश मल्हारी भगत (29) रा. घुग्घुस, प्रफुल दीपक गिरी (22) रा. घुग्घुस, सुखदेव केशव झाडे (21) रा. शिंदोला, राजेश मारोती खदरे ( 28) रा. दहिफड नेर, श्रीकांत सुरेश आगदारी (28) रा. घुग्घुस, नासिफ निजामुद्दीन शेख (31) रा.j घुग्घुस, महेश वासुदेव दुर्गे (28) रा. घुग्घुस यांना अटक करण्यात आली शिरपूर पोलिसांनी तीन गुन्ह्याचा उलगडा केला आहे. चोरीचा मुद्देमाल व वाहन असा एकूण 2 लाख 17 हजार 300 रुपये जप्त करण्यात आहे आहे. शिरपूर हद्दीतील बंद कारखाने व निर्जन ठिकाणी चोरीच्या घटना वाढल्याने विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.