घुग्घुस येथील वळण रस्त्यासाठी जनसुनावणी संपन्न

105

घुग्घुस येथील वळण रस्त्यासाठी जनसुनावणी संपन्न

चन्द्रपुर/महाराष्ट्र
रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता
सविस्तर बातमी घुग्घुस: शुक्रवार 20 ऑगस्ट रोजी घुग्घुस नप कार्यालयात घुग्घुस चंद्रपूर रस्त्यावरील वळण रस्त्यासाठी भुसंपादन करण्याचा प्रस्ताव असल्याने वळण रस्त्याच्या संदर्भात प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या हरकती व आक्षेप या विषयावर चर्चा करण्यासाठी जनसुनावणीची बैठक बोलाविण्यात आली होती.

मौजा म्हातारदेवी सर्वे नं 150, 151, 152, 153, 154/1, 154/2, 154/3 व 161 दादाजी खांडारकर, सुर्यभान कामतवार, नत्थू कामतवार, अमित पचारे, गीता कामतवार, सुमित्रा पचारे, प्रेमलाल पारधी, विठ्ठल पोलशेट्टीवार, गुलाब आवळे, दादाजी आवळे, नानाजी आवळे, सुमन खनके हे शेती देण्यास तयार आहे.

यावेळी चंद्रपूर उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी रोहन घुगे, घुग्घुस नपच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही, सहाय्यक अभियंता एस.डी.मेंढे, सार्वजनिक बांधकाम विभाग चव्हाण नायब तहसीलदार उवीअ कार्य. चंद्रपूर यांच्या समक्ष जनसुनावणी पार पडली.
वयावेळी प्रकल्पग्रस्तानी आर्थिक मोबदल्याची मागणी केली.