संपादक संजय कन्नावार यांच्यावर गुंडाचा प्राणघातक हल्ला, त्या भाडोत्री गुंडासोबतच त्यांना सुपारी देणाऱ्यावर पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी.

126

संपादक संजय कन्नावार यांच्यावर गुंडाचा प्राणघातक हल्ला.

त्या भाडोत्री गुंडासोबतच त्यांना सुपारी देणाऱ्यावर पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी:-

साप्ताहिक चंद्रपूर क्रांती तथा न्यूज पोर्टल चे संपादक संजय कन्नावार यांच्यावर दूर्गापूर परिसरातील इमली बार जवळ काही अज्ञात इसमानी प्राणघातक हल्ला केल्याने डिजिटल मीडिया असोसियेशन तर्फे दिनांक १८/८/२०२१ ला स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन हल्ला करणाऱ्या त्या गुंडा विरोधात व त्यांना सुपारी देणाऱ्या विरोधात पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी डिजिटल मीडिया असोशिशन च्या माध्यमातून संजय कन्नावार, राजू कुकडे, राजू बिट्टुरवार व इतर सदस्यांनी केली.

संजय कन्नावार यांनी आपल्या न्यूज पोर्टल वर एका बार अँड रेस्टॉरंट मधे पत्रकारांनी दुसऱ्याच्या टेबल वरील चिकन फ्रॉय चोरल्याची बातमी प्रकाशित केली होती. ती बातमी अनेक न्यूज पोर्टल वर सुद्धा प्रकाशित करण्यात आली. दरम्यान या बातमी मध्ये कुणाही पत्रकारांची नावे प्रकाशित केली नव्हती. पण दैनिक सकाळ चे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे व सर्च टीवी चे प्रतिनिधी पवन झबाडे हे पोलीस स्टेशन मध्ये जावून आमची काही पोर्टल मध्ये बातमी प्रकाशित करून बदनामी करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती व सोबतच खासदार, आमदार यांच्याकडे सुद्धा तोंडी तक्रार देण्यात आली.
पण त्या पत्रकारांनी लेखी तक्रार का दिली नाही तर ज्यावेळी ते पत्रकार दुपारच्या वेळी बार मध्ये दारू पीत होते त्यावेळी ते आपल्या कर्तव्यावर होते त्यामुळे ते लेखी तक्रार देऊ शकले नाही.

दिनांक १७ऑगस्ट ला दुर्गापूर परिसरातील इमली बार जवळ शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी संजय कन्नावार यांना फोन करून “भाऊ तू कुठे आहे? मला भेटायचे आहे. त्यात चिकन चोर संबंधात काही पुरावे आहे का मी आत्ताच आपल्याला भेटतो.”असा सात साडेसातच्या दरम्यान फोन केल्यानंतर संजय कन्नावार यांनी मी आता इमली बार जवळ आहे पण आत्ता मला भेटू नका असे सांगितले पण तू तिथेच थांब मी पाच मिनिटात तिथे पोहचतो असे म्हणून त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काही गुंड प्रवृत्तीचे लोक इमली बार जवळ आले व संजय कन्नावार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. भितीने संजय कन्नावार हे बारमध्ये शिरले व त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून या घटनेची माहिती दिली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे संजय कन्नावारची ओळख गुंडांना करून देण्यासाठी स्वःता पवन झबाडे गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होता, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे, त्यामुळे हा हल्ला त्या तथाकथित असलेल्या पत्रकारांनी गुंडांना सुपारी देऊन केला हे शीद्ध होते असा आरोप संजय कन्नावार यांनी पत्रकार परिषदेत लावला..

पत्रकारांनी एखाद्याला सुपारी देऊ पत्रकारावर हमला करणे ही बाब अत्यंत गंभीर असून पत्रकारितेला काळिमा फासणारी आहे.
संजय कन्नावार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत व इतर कलमांवये गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा डिजिटल पोर्टल असोसिएशन व संपूर्ण पत्रकार संघटना पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतील असा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला. यावेळी डिजिटल मीडिया चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.