ताडाळी येथील बंद कारखान्यात चोरीच्या गुन्ह्यात दोन भंगार चोरास अटक  तर कुख्यात मुख्यसूत्रधार फरार?

716

 

 

ताडाळी येथील बंद कारखान्यात चोरीच्या गुन्ह्यात दोन भंगार चोरास अटक

तर कुख्यात मुख्यसूत्रधार फरार?

 

दिनांक 10 ऑगस्टला घुग्घुस येथून राजेश सुनामी व डिगेश साहू यांना पडोली पोलिसांनी अटक केली.

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दिनांक 26 जुलै रोजी रात्री 11 वाजता दरम्यान ओमटी स्टील प्रा.लि. सि-4 एमआयडीसी ग्रोथ सेंटर ताडाळी येथील बंद कारखाण्यात भंगार चोरांनी प्रवेश करून विद्युत ट्रान्सफार्मर फोडून चोरी कापर चोरून नेले.

फिर्यादी धनंजय विद्यानंद चौबे (39) रा.चंद्रपूर काटा इन्चार्ज हे सकाळी कंपनीत गेले असता ट्रान्सफार्मरचे ऑइल व कापर साहित्य खाली पडलेले दिसले 13 ते 15 लाखाचे नुकसान झाल्याने त्यांनी पडोली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली तक्रारी वरून कलम 379,511 गुन्हा दाखल करण्यात आला. घुग्घुस येथील भंगार चोर आरोपी दानिश शब्बीर कुरेशी (23) रा. बँक ऑफ इंडिया मागे घुग्घुस यास अटक करण्यात आली होती. तीन आरोपी फरार होते.

पोलिसांनी कापर साहित्य 45,000 हजार एक टाटा सुमो किंमत 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता.

ही कंपनी दीपक रुपचंद्र जैन रा. चंद्रपूर यांच्या मालकीची असून चार वर्षांपासून बंद आहे त्यामुळे भंगार चोरांनी बंद असलेल्या कंपन्यांना लक्ष केले आहे.

टाटा सुमो क्र. एमएच 40 पी 712 च्या आतील बसण्याच्या सिटा काढून टाकून ती जागा रिकामी करून त्यात चोरीचे भंगार साहित्य टाकून चोरी करण्यात आली ही सुमो ओमटी कंपनीच्या कापर साहित्य चोरीत आरोपीनी वापरली होती.

 

यवतमाळ जिल्ह्यातील शिंदोला जवळील शालिवाना पावर प्लांट 5 ते 6 वर्षांपासून बंद आहे येथून कापर साहित्य भंगार चोरांनी चोरून नेले तसेच घुग्घुस जवळील उसगाव येथील गुप्ता पावर प्लांट हा 5 ते 6 वर्षांपासून बंद आहे येथून अनेक भंगार साहित्य चोरीस गेले आहे.

पुढील तपास पो.नि. एम.एम. कासार यांच्या मार्गदर्शनात पोहवा. प्रकाश निखाडे करीत आहे.