वरोरा येथे शेकडो विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश. मनसे नेते रमेश राजूरकर व जिल्हाध्यक्ष दिलीप रमेडवार यांची उपस्थिती.

140

वरोरा येथे शेकडो विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.

मनसे नेते रमेश राजूरकर व जिल्हाध्यक्ष दिलीप रमेडवार यांची उपस्थिती.

चन्द्रपुर/महाराष्ट्र

वरोरा प्रतिनिधी :-
सविस्तर बातमी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेत्रूत्वावर युवा कार्यकर्त्याचा मोठा विश्वास वाढत चालला असून युवकांना आपले राजकीय करियर घडविण्याची मोठी संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मिळत आहे. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रूत्वात व जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलने व उपक्रम वरोरा तालुक्यात व शहरात राबविल्या जात आहे. याचा फायदा पक्षाला होत असून विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे युवा कार्यकर्त्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहे. येणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता मोर्चे बांधणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवात केली असून मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्त्या चा मनसे मधे पक्ष प्रवेश कार्यक्रम काल दिनांक ८ ऑगस्ट ला दुपारी २.०० च्या दरम्यान व्रुचीता सभागृह येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव मुज्जामील शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे भद्रावती तालुका पदाधिकारी रोहित वाभिटकर. सामजिक कार्यकर्ते राहुल लोणारे, सेवा ग्रुप वरोरा येथील कार्यकर्ते यांच्यासह शरद पुरी,अनिकेत पुरी,अभिजित अष्टकार,निखील मांडवकर, कुणाल तवाडे, प्रितम ठाकरे, जयराम नैताम, कुंदन मेश्राम, पियुष धवस,धीरज गायकवाड, पंकज वसाके, रोहित खिरटकर, अभिजित आसुटकर, अनिकेत पारशिवे, हिमांशू भगत,नितीन उपरे,कपिल बांदुरकर,अनिकेत जुनघरे,लखन मांडवकर, संस्कार कोरेकर रितिक चिंचोलकर,अक्षय रोडे,निखिल मांडवकर, कृष्णा ढोके,वैभव ठाकरे,अक्षय नागपूरे,रोहित पिंपळशेंडे,चेतन निकोडे,रोहित मेश्राम इत्यादी
विविध सामाजिक कार्यकर्त्यानी मनसेत प्रवेश केला.

मनसेच्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात मनसे नेते रमेश राजूरकर. जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार यांनी येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीत मनसेला मोठे यश कसे निर्माण करता येईल यासाठी प्रभावी पक्ष संघटन बांधणी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, तालुका अध्यक्ष वैभव डहाने. चंद्रपूर मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे.तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, तालुका सचिव कल्पक ढोरे. तालुका उपाध्यक्ष विक्रम चंदनखेडे. शंकर क्षीरसागर.शहर उपाध्यक्ष अजिंक्य नरडे, रमाकांत थेरे. राजेंद्र धाबेकर, राजू  नवघरे इत्यादींनी प्रयत्न केले.