घुग्घुस येथील राजीव रतन रेल्वे फाटक दिवसातून अनेकदा बंद होत असल्याने नागरिकांन मनस्ताप, उड्डाणपूल बनविण्याची मागणी धूळखात

348

घुग्घुस येथील राजीव रतन रेल्वे फाटक दिवसातून अनेकदा बंद होत असल्याने नागरिकांन मनस्ताप, उड्डाणपूल बनविण्याची मागणी धूळखात

चन्द्रपुर/महाराष्ट्र

सविस्तर बातमी:- चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील राजिव रतन रेल्वे फाटक दिवसातून अनेकदा बंद होत असल्याने नागरिकांना व रुग्णावाहिकाला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग चंद्रपूर तसेच वणी मार्गे मुंबई ला जोडणारा असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या रेल्वे मार्गाने वेकोलीच्या कोळशाची तसेच सिमेंट ची वाहतुक होत असते. अशातच मागील 20 वर्षापासून या रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बनविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र शासन व प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे या मार्गावर ये जा करणाऱ्या स्थानिक तसेच वाहतूक दारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

 

वाहतुक पोलिस कर्मचारी ला तैनात करण्यात

  • स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसातून विस ते पंचविस वेळा हा रेल्वे फाटक बंद होते.तसेच दररोज या ठिकाणी रुग्णवाहिका अडकून राहत असून एखाद्या गंभीर रुग्णांचा जीव सुद्धा जाण्याचा धोका आहे. तसेच या मार्गावर मोठमोठ्या वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच रेल्वे फाटक उघडताच नेहमी वाहतुक कोंडी होत असून विविध प्रकारचे अपघात सुद्धा झाले आहेत. त्यामुळे येथे वाहतुक पोलिस कर्मचारी ला तैनात करण्यात यावे अशी मागणी नागरिकातर्फे केल्या जात आहे.