कर्करोगग्रस्त रुग्णाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यातर्फे आर्थिक मदत

184

कर्करोगग्रस्त रुग्णाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यातर्फे आर्थिक मदत

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 06 अगस्त 2021

सविस्तर बातमी:- मंगळवार 3 ऑगस्ट रोजी घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यातर्फे येथील वार्ड क्रमांक 3 येथे राहणाऱ्या मारोती शिवरकर या कर्करोगग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली.

 

40 वर्षीय मारोती शिवरकर हा घुग्घुस येथे हाथरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत करीत होता. कोरोना महामारी मुळे टाळेबंदीच्या काळात हाताला काम नसल्याने बेरोजगार झाल्याने आर्थिक विवंचनेत सापडला. अश्यातच 2 महिन्यापूर्वी मारोती शिवरकर यांना कर्करोगाची लागण झाली.

 

त्यामुळे त्याचा कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले.

  • त्यांनी देवराव भोंगळे यांच्याशी संपर्क केला व त्यांच्या मदतीने नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रुग्णालयात भरती झाला. दोन महिने कर्करोग रुग्णालयात उपचार घेऊन तो घरी परत आला, परंतु त्याला पुन्हा दहा दिवसांनी नागपूर येथे उपचारासाठी डॉक्टरांनी बोलाविले त्यामुळे त्याच्या कुटुंबियांसमोर आर्थिक संकट उभे झाले.

 

पैश्याची जुळवाजुळव करण्यासाठी फिरत असतांना त्याच्या कुटुंबीयास येथील नागरिकांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात आर्थिक मदतीसाठी जाण्यास सांगितले, त्यामुळे त्यांनी या केंद्रात येऊन आपली समस्या विवेक बोढे सरांना सांगितली.

 

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मारोती शिवरकर यांच्या कुटुंबीयास तात्काळ आर्थिक मदत दिली. मदत मिळताच त्यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांचे आभार मानले.

 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, पुष्पा शिवरकर, देव डोंगरे, भाजपा नेते हसन शेख, हेमराज बोमले, अनंता बहादे, विवेक तिवारी उपस्थित होते.