भाजप युवा मोर्चाचे राज यादव यांच्या सह शेकडो युवकांचा काँग्रेमध्ये प्रवेश 

757

भाजप युवा मोर्चाचे राज यादव यांच्या सह शेकडो युवकांचा काँग्रेमध्ये प्रवेश 

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 19 जुलाई 2021
सविस्तर बातमी चंद्रपूर : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली तेव्हापासून सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने सन्मान मिळत आहे. समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत विकास पोहोचत आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचा या कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळेच समाजातील विविध पक्षातील युवक हे काँग्रेसमध्ये येत आहे. काल दिनांक १७ जुलै रोजी बाबुपेठ येथील बजरंग मैदान बायपास रोड येथे शेकडो युवकांनी काँग्रेमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यावेळी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत आशा वर्कर व सफाई कामगार यांचा कोरोना योद्धयांच्या सत्कार देखील करण्यात आला.
                 यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, काँग्रेस चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती अनुताई दहेगावकर, अश्विनी खोब्रागडे, इंटक अध्यक्ष प्रशांत भारती, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, कुणाल चहारे, पप्पू सिद्धीकी यांची उपस्थिती होती.
बाबुपेठ येथील युवा नेतृत्व राज यादव यांच्या नेतुत्वात हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात येथील होती. येथील युवकांनी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यात राजवीर यादव, अक्षय बोबडे, रमेश पारनंदि, राम नरेश यादव, स्वप्नील केळझरकर, पुणेशस्वर साहू, रवींद्र नागेली, नितेश मंडळ, राजू नकुलवार, रियाझ अली, पंकज पिटूरवार, नूर हाकीम, वेदांत आवारी, अजय चिकटे, पावन यादव, दीपक आसवानी, तरुण जेमदी, सचिन हजारे, राहुल हजारे, अनंता सुरमवार, प्रवीण हजारे, असिफ खान, जावेद, शुभम ठाकूर, भारत निकोसे, राजू यादव, पंकज लोंढे, सागर शिंग उप्पल, सुराजशिग, सलमान शेख यांच्या सह शेकडो कार्यकर्त्याच्या समावेश होता.