ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश

299

 

 

ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.14 जुलाई 2021

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी चंद्रपूर: चंद्रपुरातील शिक्षण क्षेत्रातील अग्रणी संस्था चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक व विदर्भातील शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणारे डॉ. अशोक जीवतोडे यांनी आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला .

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.