अमराई येथील महिलेवर दुसऱ्यांदा हल्ला करणारा आरोपी फरारच

228

अमराई येथील महिलेवर दुसऱ्यांदा हल्ला करणारा आरोपी फरारच

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.08 जुलाई 2021
रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी :- आरोपी सुरज पाझारे रा. अमराई वार्ड, घुग्घुस यास पाडण्यात घुग्घुस पोलिसांना अपयश आले तीन दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा आरोपी सुरज पाझारे हा फरार आरोपी पोलिसांना गवसला नाही त्यामुळे घुग्घुस पोलिसांच्या कार्यक्षमते वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मंगळवार 6 जुलै रोजी सकाळी दरम्यान आरोपी सुरज पाझारे रा. अमराई वार्ड घुग्घुस याने कविता सरोदे रा. अमराई वार्ड, घुग्घुस या पोलीस स्टेशन येथे तक्रार का दिली म्हणून जोड्याने मारहाण केली त्यामुळे महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली फिर्यादी महिला घरा शेजारी किराणा दुकानात गेली असता तिला एकटीला पाहून मारहाण केली.

सकाळी फिर्यादी महिलेने घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली कलम 323,504,506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी सोमवार 5 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता दरम्यान घुग्घुस येथील अमराई वार्डात राहणारी महिला कविता पद्मभूषण सरोदे वय 30 वर्षे यांच्या वर वार्डातीलच सुरज पाझारे याने तिच्या डोक्यावर काठीने मारून जखमी केले.

त्यामुळे महिलेने घुग्घुस पोलीस स्टेशन तक्रार दिली तक्रारी वरून घुग्घुस पोलिसांनी कलम 324,504,506 गुन्हा दाखल केला आहे.

दुपारी दरम्यान फिर्यादी महिलेच्या घरासमोर सुरज पाझारे हा दारू पिऊन दुचाकी परत घेतल्याच्या कारणावरून महिलेस व तीच्या पतीस अश्लील शिवीगाळ करू लागला महिलेने हटकले असता सुरज पाझारे याने काठीने डोक्यावर वार केला.

घुग्घुस पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यास उशीर केल्याने परत दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने महिलेवर हल्ला केला.