गुप्ता वॉशरीज विरोधात ८ जुलैला ठिय्या आंदोलन

379

गुप्ता वॉशरीज विरोधात ८ जुलैला ठिय्या आंदोलन…!

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 03 जलाई 2021

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी घुग्घुस: शेनगांव येथील महामीनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.लिमि. घुग्घुस युनिट ही कोल वाशरीज मागील तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली असून याठिकाणी पाच मोठया ट्रान्सपोर्टर धारकांना कोळसा वाहतुकीचे काम देण्यात आले.या मोठ्या ट्रान्सपोर्ट द्वारे घुग्घुस परिसरातील दीडशे चालक – मालक यांचे शोषण करण्यात येत आहे.एकीकडे डिझेल दर दररोज वाढत असतांना वाहतूक भाड्यात मोठी कपात करून स्थानिकांचे शोषण करीत असल्याने सदर चालक मालक यांनी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांना मददत मागितली स्थानिकांच्या हक्कासाठी चालक मालक यांना घेऊन गुप्ता वॉशरीज येथे हल्लाबोल करण्यात आले.व आठ दिवसांत काम देण्याची मागणी करण्यात आली मात्र व्यवस्थापना तर्फे कुठलाच तोडगा न निघाल्याने दिनांक 08 जुलै रोजी दीडशे वाहना सह वॉशरीजच्या मेन गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून यात परिसरातील सर्व चालक मालक यांनी सहभागी होण्याचे आवाहन राजूरेड्डी केली