आंदोलनाला आज अकरावा दिवस सुरू… निलंबित पत्र वापस घेऊन त्या कामगारांना परत कामावर रुजू करा अन्यथा आमरण उपोषण सुरू राहील

256

निलंबित पत्र वापस घेऊन त्या कामगारांना परत कामावर रुजू करा अन्यथा आमरण उपोषण सुरू राहील,आंदोलनाला आज अकरावा दिवस सुरू…

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 16 जुन 2021
रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता
सविस्तर :-चंद्रपूर/घुगघुस: दि. 15 जुन 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या माध्यमातून ACC चांदा सिमेंट कंपनीच्या विरोधात PF चोरी प्रकरणात बेमुदत धरणे आंदोलनाला आज अकरावा दिवस सुरू झाला असून आतापर्यंत ACC प्रशासनाने ठेकेदारावर कुठलीही कारवाई केलेली नाही उलट जो कामगार आपल्या हक्कासाठी व चोरी केलेल्या PF च्या हक्कासाठी व आपल्याला न मिळालेल्या अधिकारासाठी आंदोलन करत आहेत. हे कामगार काम बंद न ठेवता या कामगारांनी हे आंदोलन करत आहे. एसीसी प्रशासन व ठेकेदार या कामगारांवर या आंदोलनामध्ये सहभाग आहे त्या कामगाराना ACC कंपनी ने व ठेकेदाराने मिळून कामगारांना निलंबित करण्यात आले आहे कामगारांचा आरोप आहे की जेव्हा ठेकेदाराने दहा वर्षाच्या PF चोरी केला तेव्हा त्या ठेकेदारावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही
उलट कामगारांवर हुकुमशाही तानाशाही व धमक्या देऊन दबाव टाकत आहे त्यांना निलंबित करण्यात येत आहे दि 15 जुन पासून 9 कामगारांना निलंबित करण्यात आले व आणखी निलंबित काही कामगारांना करण्यात येणार असा प्रकार चा ठेकेदाराकडून धमक्या कामगारांना देण्यात येत आहे जर कोणी आपल्या हक्काच्या मागणी केली तर निलंबित करण्यात येणार कोणतेही गलती नसल्याने सुध्दा आमच्यावर खोटे आरोप लावण्यात येत. कामगारांचे माणसीक छड व माणसीक तनाव या कामगारांवर करण्यात येत आहे अशा वेळेस कोणत्याही कामगाराने या दबावामुळे स्वतःला काही कमी जास्त केल्यास याचे जिम्मेदारी ACC प्रशासन व ठेकेदार नितीन शर्मा आणी शासन राहील आम्ही आमच्या कामगाराच्या हक्कासाठी आंदोलन करत आहोत हा काय गुन्हा आहे का जर हा गुन्हा असेल तर सर्व कामगार आपल्या हक्कासाठी व कामगारांवर होणारे शोषण थांबविण्या साठी हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मी वारंवार करत राहील असे जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले जो पर्यन्त आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही सर्व कामगार या आंदोलनामध्ये सहभाग राहील. व निलंबित पत्र लवकर लवकर वापस घेऊन त्या कामगारांना वापस कामावर रुजू करण्यात आले पाहिजे अन्यथा आम्ही आमरण उपोषण सुरू करु
असे निवेदन सादर करताना. ईश्वर बेले अशोक भगत, इरफान पठाण, सचिन माहुरे, दत्ता वाघमारे, शरद पाईकराव, प्रवीण भोयर, अशोक आसमपल्लीवार, दिपक दिप, राकेश पारशिवे, आदित्य सिंह, सदानंद ढोरके, उपस्थित होते