शासनानी ट्रॅक्टर मालकाकडून दंड वसूल करून त्यांचे ट्रॅक्टर सोडण्यात यावे अन्यता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही ट्रकटर चालक मालक महसूलनी जप्त केलेली ट्रॅक्टर सोडण्याची मांगणी

256

महसूलनी जप्त केलेली ट्रॅक्टर सोडण्याची मांगणी

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 16 जुन 2021
रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता
सविस्तर :-चंद्रपूर, घुगघुस: वर्धा नदीच्या चिंचोली घाट,व घोडा घाटावरून सन 2020 मध्ये अवैध रेतीची उचल करताना महसूल अधिकारी यांनी पंचवीस ट्रॅक्टर पकडून प्रति ट्रॅक्टर 1लाख 10 हजार 900 रुपयाची दंडात्मक कारवाई केली होती.यापैकी काही ट्रॅक्टर मालकांनी दंड भरून ट्रॅक्टर सोडविले तर काही ट्रॅक्टर मालकाकडे रक्कम नसल्याने त्यांनी दंड भरला नाही. यामुळे 22 ट्रॅक्टर जप्त करून नायब तहसील कार्यालया समोर ठेवण्यात आले आहे.

शासनानी ट्रॅक्टर मालकाकडून दंड वसूल करून त्यांचे ट्रॅक्टर सोडण्यात यावे अन्यता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय

  • हे ट्रॅक्टर वर्षभरापासून उभे असल्यामुळे जागेवरच खराब होत आहे.तसेच ट्रकचर्चा स्पेअर चोरी होत आहेत यामुळे सोमवारला ट्रॅक्टर मालकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की सध्या कोरोना विषाणूमुळे सगळयाची परीस्थिती लोटपोट आहेत आमचा परिवार ट्रॅक्टरवर अवलंबून असल्यामुळे तो ट्रॅक्टर जप्त केल्याने 22मालक,22 चालक व एका ट्रॅक्टरवर 4 कामगार अशा तीनशे कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे.आम्ही रक्कमेची जुळवाजूळव केली असून दंड भरण्यास तयार आहे तरी आमचे ट्रॅक्टर सोडण्यास प्रशासन तयार नाही. प्रशासनानी ट्रॅक्टर क्रमांक एमएच 29/व्ही 381 चा मालक नंदू घोडके यांना 110900/ चा दंड दिला त्याप्रमाणे त्यांनी भारतीय स्टेट बँक येथे चालन क्रमांक जीआरएन एमएच 041312368-202021एम दिनांक 17.06.2020 ला रक्कम भरणा केली तरी त्यांचा ट्रॅक्टर सोडण्यात आला नाही असे सांगितले.तरी प्रशासनानी ट्रॅक्टर मालकाकडून दंड वसूल करून त्यांचे ट्रॅक्टर सोडण्यात यावे अन्यता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे पत्रकार परिषेद ट्रकटर चालक मालक द्वारे सांगण्यात आले.

पत्रकार परिषेदेला उपस्थित होते

  • यावेळी पत्रकार परिषेदेला हितेश लोढे, विलास रामटेके, मुन्ना जुल्फेकर अहमद, खलील अहमद, नत्थू घोडके, पिंटू लोढे, आनंद मिश्रा, प्रल्हाद घोडके, नभी शेख, समीद्दीन शेख, मोसीन खान,अंकुश ठाकरे, अशोक घोडके व चालक, कामगार उपस्थित होते