स्वप्नील पिदूरकर आहेत तरी कोण ? अनेक तक्रारी नंतरही वरिष्ठ अधिकारी का करताय पाठराखन

303
स्वप्नील पिदूरकर आहेत तरी कोण ?
अनेक तक्रारी नंतरही वरिष्ठ अधिकारी का करताय पाठराखन

चंद्रपूर/गडचांदुर
दि. 11 जुन 2021
सविस्तर :- चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे औद्योगिक शहर गडचांदूर येथील नगरपरिषद मागील दिड,दोन वर्षापासून सतत नाना कारणाने चर्चेत आहे.याठिकाणी नेमके चालले तरी काय ? असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतोय.याठिकाणी कार्यरत असलेला मेकॅनिक इंजिनीअर स्वप्नील पिदूरकर याच्या विरोधात अनेक तक्रारी असताना वरिष्ठ अधिकारी याची पाठराखण का करताय,अखेर पिदूरकर हा आहेत तरी कोण ? असे निर्वाणीचे प्रश्न विचारले जात आहे.स्वप्नील पिदूरकर याच्याकडे आरोग्य व पाणी पुरवठा असे मलींदा मिळणारे खाते असल्याने बऱ्याच ठिकाणी यांनी भ्रष्टाचार करून मोठी धनसंपत्ती गोळा केल्याची चर्चा आहे.यापुर्वी गोंडपिपरीतही याच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्याचे कळते.मात्र कारवाई तर सोडाच साधी चौकशीही न झाल्याने वरिष्ठांची भुमिका संशयास्पद बनली आहे.गडचांदूर नगरपरिषद मार्फत शहरातील मध्यभागी असलेल्या ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे.मात्र हे काम अत्यंत निकृष्ट व दर्जाहिन होत असून यात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नगरपरिषदेतील विरोधी पक्ष नगरसेवक रामसेवक मोरे व नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.

काम पुर्णपणे निष्कृष्ठ दर्जाचे झालेले आहे

सविस्तर असे की,नगरिषदेच्या सहाय्य निधीतून सन २०१९ मध्ये शहरात पाण्याची टंचाई लक्षात घेता सहाय्य निधीतून नवीन टाकी मंजूर करण्यात आल्याची माहिती असून सदरचे काम एमजीपीला देण्याचा मानस तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा होता असे कळते. परंतू याच दरम्यान न.प.ची निवडणुक लागली आणि सत्तापरिवर्तन झाले.नंतर हे काम एमपीजीला न देता पिदूरकर यांनी स्वतःकडे ठेवले.सध्या टाकीचे काम शेवटच्या टप्प्यात असून हे काम पुर्णपणे निष्कृष्ठ दर्जाचे झालेले आहे असे आरोप निवेदनातून करण्यात आले आहे.या टाकीत नेहमीच लाखो लिटर पाणीसाठा राहत असल्याने टाकीवर मोठ्याप्रमाणात भार असतो.कामाचा दर्जा पाहता भविष्यात टाकी कोसळून दुर्दैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली तर जबाबदार कोण ? यासाठी टाकीचे बांधकाम दर्जेदार होणे गरजेचे होते.मात्र मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी व पाणीपुरवठा विभाग प्रमुख स्वप्नील पिदूरकर यांनी संगनमत करून टाकीचे बांधकाम निष्कृष्ठ दर्जाचे करून मोठा आर्थीक भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी आरोप सदर निवेदनातून करण्यात आला आहे
.

भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने सदरचे काम न.प.कडेच ठेवले

वास्तविक पाहता सदर कामाची कार्यान्वय यंत्रणा ही महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाला देणे आवश्यक होते.मात्र या कामात मोठा भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने सदरचे काम न.प.कडेच ठेवले.आणि याठिकाणी सिल्हिल इंजिनीअर उपलब्ध असताना सुद्धा त्याच्याकडे देखरेखची जबाबदारी न देता पाणीपुरवठा विभाग प्रमुख, मेकॅनिकल इंजिनीअर स्वप्नील पिदूरकर यांनी स्वतःकडेच ठेवली.याला मुख्याधिकारी डॉ.शेळकी यांनी मान्यताही दिली.पिदूरकर हा मेकॅनिकल इंजिनीअर असून त्याला सिव्हील कामाचा कुठलाही अनुभव नाही.निव्वळ कामात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने यांच्याकडे टाकीचे काम सोपवण्यात आले.तसेच याला सिव्हिल कामाची एमबी बनविण्याचे अधिकार नसतांना त्याने स्वतः वाढीव एमबी बनविली व त्यानुसारच संबंधित ठेकेदाराला आरए बिल मा्अधक्षाचे मंजुरीने दिले.सध्या परिस्थितीत काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहचले असून अंतिम बिल काढण्याच्या बेतात असल्याची माहिती देत सदर बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करावी,यापुर्वी आरे बिल देताना सादर केलेल्या एमबीची चौकशी करावी तसेच थर्डपार्टी ऑडीट मोक्यावर व्हिडीओ शूटींगद्वारे करण्याचे आदेश द्यावे,नंतरच अंतिम बिल देण्यात यावे अशी मागणी वजा विनंती या दोन्ही नगरसेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी करून

सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,माजी वित्त व नियोजन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार,माजी आमदार संजय धोटे,जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विभाग चंद्रपूर यांनाही निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.पिदूरकर याच्या विरोधात आजपर्यंत करण्यात आलेल्या तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी करून सत्यता जनतेपुढे आणण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत असून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आता स्वप्नील पिदूरकर याची चौकशी करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.