घुग्घुस येथील वाळू माफियांची रेल्वे फाटकाला ज़ोरदार धड़क

348

घुग्घुस येथील वाळू माफियांची

रेल्वे फाटकाला ज़ोरदार धड़क

चन्द्रपुर/महाराष्ट्र

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

दि. 03 जुन 2021

घुग्घुस: गेल्या कितीक वर्षापासून रेती घाटाची निलीमी प्रकिया न झाल्यामुळे अवैध वाळूची

उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल खनिकर्म तलाठी, यांच यावर जाणून दुर्लक्ष सुरु आहे,त्यामुळे अवैध वाळू माफियांची हिंमते दिवसे- दिवस वाढत आहे, एक जून ला रात्री ,9 वाजेदरम्यान अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रैक्टर ने एसीसी सिमेंटच्या रेल्वे फाटकाला ज़ोरदार धड़क देत, धड़क इतकी जबर होती की ते फाटक दोन तुकड्यात ध्वस्त झाले, सदर रेल्वे फाटक हे घुग्घुस पोलीस स्टेशनच्या बाजूला आहें,मात्र दुर्लक्ष होत आहे, ट्रैक्टरच्या धडकेत रेल्वे फाटक दोन तुकड्यात ध्वस्त झाले, काही काळ तेथे वाहतूक विस्कळीत झाली, ट्रैक्टर चालक घटना स्थलावरुन पळ काळला, सदर ट्रकटर चालवणारा हा गाडीचा चालक मालक होता आता या अवैध वाळू माफियावर रेल्वे विभाग, पोलीस प्रशासन,की महसूल विभाग कार्रवाई करणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,