घुग्घुस राजीवरतन हॉस्पिटल एवं चिचपल्ली, दुर्गापूर,ताडाळी येथे ही कोविड लसीकरण केंद्राला सुरुवात

489

घुग्घुस राजीवरतन हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण केंद्राला सुरुवात

चिचपल्ली, दुर्गापूर,ताडाळी येथे ही कोविड लसीकरण केंद्राला सुरुवात

जिल्हा आरोग्य केंद्राच्या आदेशाने अंमलबजावणी 

चन्द्रपुर/महाराष्ट्र।      दि.१५ मार्च २०२१   

रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता

चंद्रपूर : कोरोना कोविड – 19 या संसर्गजन्य रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता तालुक्यातील घुग्घुस, चिचपल्ली, दुर्गापूर, ताडाळी, येथे 10 मार्च पासून कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याचे लेखी आदेश आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असून सदर लसीकरण हे सोमवार, बुधवार,गुरुवार, शनिवार रोजी दुपारी 12 ते 02 व 04 घेणे आहे.

सदर लसीकरण सत्रात 45 ते 59 वयातील कोमाब्रीड असलेले व 60 वर्षावरील लाभार्थ्यांचा समावेश असणार आहे.

नियमित आजार असलेले नागरिक कोविड योद्धा,सर्व फ्रंट लाईन वर्कर, शासकीय कर्मचारी यांनी कुठल्याही प्रकारची चिंता व भीती न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

घुग्घुस येथील वेकोलीच्या राजीव रतन हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण केंद्र शुरू झाले असून या ठिकाणी सकाळी 09 ते 05 यावेळेस आधारकार्ड, वोटींग कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना यापैकी कुठलेही एक ओळखपत्र सोबत घेऊन आपली नोंदणी करवून घ्यावी ठरल्या दिवशी व ठराविक काळात पूर्ण काळजीपूर्वक लसीकरण करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी वाकदकर व राजीव रतन येथील वैद्यकीय अधिकारी आनंद यांनी दिली आहे.

याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व राजीव रतन येथील कर्मचारी उपस्थित होते.