विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिन सोनवाने यांचा पुढाकार, शंकरपुरात प्रथमच धावेल सकाळ पाळीत बस

346

साकोली, भंडारा

~१४ मार्च.~ 

_तालुका प्रतिनिधी_ 

तालुक्यातील शंकरपुर/वडेगाव हे खेडेगाव अगदी विरळ वस्तीचे, त्यामुळे बर्याच सोयी उपलब्ध नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी व गावकऱ्यांना तालुक्याच्या व इतर ठिकाणी जायचं म्हटलं तर भयंकर त्रासचं !

एक वर्षी पूर्वी पासून शंकरपुर येथे सकाळ पाळीत १० वाजे ची बस सेवा चालू करण्यात आली आहे त्यामुळे दुपार पाळीत शाळा असणार्या विद्यार्थ्यांना तसेच इतरत्र कामं करणार्या ग्रामवासीयांना सोयीस्कर झालं.

मात्र ज्यांच सकाळ पाळीत ७ वाजेचं महाविद्यालयाचे वेळ असते त्यांना बाहेर गावी स्वतःच्या साधनानी जाऊन व तिथून बसने प्रवास करावा लागत होता ज्यांच्याकडे साधन नाही त्यांना शैक्षणिक नुकसानाला देखील बळी पडावे लागत होते.

गावकऱ्यांची समस्या जाणून घेताच श्री राम सेना साकोली च्या वतीने विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिन सोनवाने यांच्या उपस्थितीत दि. १७ फेब्रुवारीला मागणी अर्ज करण्यात आला होता.

श्री राम सेनेच्या मागणीला यश मिळाले असून शंकरपुर येथे दि. १५ मार्च पासून एस.टी. महामंडळाची बस-सेवा सुरू होत आहे.

तालुक्यात व शंकरपुरात श्री राम सेनेचे व विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिन सोनवाने यांचे कौतुक देखील गेले जात आहे.