श्री राम सेनेच्या वतीने शंकरपुर येथे बस सेवेची मागणी !

258

साकोली/भंडारा

_१८ फेब्रु._

~तालुका प्रतिनिधी~

“जेथे गाव तेथे लाल परी” या सिद्धांतावर चालणारे महाराष्ट्र शासन यांचे धोरण ! मात्र प्रत्येक चांगल्या गोष्टीला वाद असतोच हे मात्र खरं !

तालुक्यावरून १५ किमी अंतरावर वसलेले शंकरपुर हे खेडेगाव एकदी विरळ वस्तीचे ! त्यामुळे गावकऱ्यांना बर्यांच शासकीय सुविधांचा लाभ योग्य त्या रितीने मिळत नाही.

शंकरपुर येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं, मात्र गावात सकाळ पाळीत प्रवासाच्या सोयी नसल्यामुळे विद्यार्थी आपल्या पाल्यांच्या साधनांनी शाळेत हजेरी लावतात; मात्र ज्यांच्याकडे स्वतःचं साधनचं नाही अशा विद्यार्थ्यांना बाहेर गावी जाऊन बसने प्रवास करावा लागतो व एक मोठा त्रास सहन करावा लागतो.

अशा या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून श्री राम सेना विद्यार्थी सामाजिक संघटना साकोली च्या वतीने श्री.गौतम शेंन्डे (आगार व्यवस्थापक प्रमुख) यांना शंकरपुर येथे सकाळ पाळीत बस-सेवा सुरू करण्या करिता आवेदन पत्र देण्यात आले.

वरील आवेदन पत्र देतांनी प्रमुख उपस्थितीत श्री राम सेनेचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिन सोनवाने तसेच श्री राम सेना शंकरपुर चे उपाध्यक्ष राकेश सयाम यांच्या हस्ते देण्यात आले.