आरोग्य हिच खरी संपत्ती: शिवानी वडेट्टिवार नागरीकांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

330

चन्द्रपुर/महाराष्ट्र

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

चंद्रपुर, दि. 14 फेब्रुवारी: नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष देवुन सुदृढ आरोग्य राखणे गरजेचे आहे.खऱ्या अर्थाने आरोग्य हिच संपत्ती आहे, असे मत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी शिवानी वडेट्टिवार यांनी व्यक्त केले.

वंदनिय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथी निमीत्य विनामुल्य मोतिबींदु डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आज श्री. गुरुदेव प्रार्थना मंदिर वासेरा सिंदेवाही येथे संपन्न झाले.
या शिबीराचे आयोजक लायन्स क्लब चंद्रपुर, प्राथमिक आरोग्य केंद्र, वासेरा, श्री. गुरुदेव सेवा मंडळ वासेरा, तालुका काँग्रेस कमेटी, सिंदेवाही तथा श्री. रमाकांत श्रीधरराव लोधे मित्र परीवार हे होते.

पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांचे प्रयत्नातुन 2515 ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत वासेरा येथे सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन शिवानी वडेट्टिवार यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष रमाकांतजी लोधे,परशुराम काकाजी बोरकर, चंद्रशेखरची हेमके, संजय काथरकर, गिरीधरजी नाकाडे, नवनियुक्त सरपंच महेश बोरकर,…. प्रामुख्याने उपस्थित होते.